Namdev Gharal
जगात अनेक देशांमध्ये बेडकांचे पालन केले जाते यामध्ये चिन हा सर्वात मोठा बेडूक उत्पादक देश आहे
यानंतर व्हिएतनाम, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया यासह युरोपमधील ही काही देशांमध्ये बेडूक पालन केले जाते.
एका अंदाजानूसार वर्षाला सुमारे 40 million डॉलर्स इतकी फ़्रॉग लेग्जचा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे
चिनमध्ये प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी बेडूक शेती केली जाते, या मांसाला चिनसह इतर आशियाई देशांमध्ये मोठी मागणी आहे.
या शेतीमध्ये प्रामुख्याने Chinese Edible Frog , बूल फ्रॉग, पॅडी फ्रॉग, टायगर फ्रॉग या जातीच्या बेडकांचे पालन केले जाते.
चिनमध्ये गुआंगडोंग, गुआंगशी, फुजियान, झेजियांग, हुनान या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक बेडूक फार्म आहेत.
या बेडकांसाठी जिवंत कीटक, लहान मासे, कोळंबी, तसेच कृत्रिम प्रथिनयुक्त खाद्य हे आहार म्हणून दिले जाते
चीनमध्ये दरवर्षी लाखो टन बेडूक मांस तयार होते हे मांस स्थानिक रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि थायलंड, व्हिएतनाम, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांना निर्यात केले जाते.
बेडकाच्या मांसाचे प्रमूख वैशिष्ट्य म्हणजे बेडूक मांस प्रथिनयुक्त व कमी फॅटचे असते. त्याच्या कातडीचा उपयोग फॅशन उद्योगात वाद्यांच्या ड्रम हेडसाठी केला जातो
त्याच बरोबर प्रयोगशाळेत जीवशास्त्रीय अभ्यासासाठी व काही विदेशी जाती शोपीस किंवा अॅक्वेरियमसाठीही वापरल्या जातात
इतर देशात बेडूक पालन हे सोपे असले तरी भारतात हे वन्यजीव संरक्षण कायद्यांअंतर्गत कडक नियमांखाली येत असल्याने अगदी मर्यादित स्वरूपात बेडूक पालन केले जाते.