Anirudha Sankpal
फायद्यांसोबत तोटे
वाफ घेण्याचे फायदे असले तरी चुकीच्या पद्धतीने आणि अति प्रमाणात वाफ घेतल्यास त्याचे गंभीर तोटे होतात.
तापमानावर नियंत्रण नसणे
घरात पातेल्यात पाणी उकळून टॉवेल ओढून वाफ घेताना तापमानावर कसलेही नियंत्रण (Temperature Control) नसते.
अतिवाफेचा धोका
दिवसभरातून ४ ते ६ वेळा वारंवार वाफ घेतल्याने आजार बरा होत नाही, उलट नुकसान होते.
श्वसननलिकेची हानी
नाकात आणि घशात असलेली संरषक त्वचेची नाजूक लेयर (Respiratory Epithelium) गरम वाफेने खराब होते.
सिलियाचे नुकसान
नाकातील सूक्ष्म केस (Cilia) जे कफ आणि घाण बाहेर टाकण्यास मदत करतात, ते अति उष्णतेमुळे जळून नष्ट होतात.
निसर्गदत्त संरक्षण संपणे
श्वसनमार्गाचे हे नैसर्गिक सुरक्षा कवच जळाल्यामुळे संसर्गाचा (Infection) धोका अधिक वाढतो.
लहान मुलांसाठी धोकादायक
लहान मुलांना वाफ देताना तापमानावर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्यांना मोठा इजा होऊ शकते.
योग्य काळजीची गरज
वाफ ही मर्यादित प्रमाणात, योग्य तापमानात आणि ठराविक वेळीच घेतली पाहिजे.