Vitamin B12 benefits | फीट राहायचंय? मग शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमतरता पडू देऊ नका!

पुढारी वृत्तसेवा

व्हिटॅमिन बी१२ चा संबंध सामान्यतः तांबड्या रक्तपेशी आणि मज्जासंस्थेच्या आरोग्याशी जोडला जातो.

कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले की, शरीरात ऊर्जा आणि स्नायू मजबूत ठेवण्यात या जीवनसत्त्वाचा वाटा अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मोठा आहे.

'जर्नल ऑफ न्यूट्रिशन'मध्ये प्रसिद्ध अभ्यासानुसार, व्हिटॅमिन बी१२ पेशींच्या चयापचय क्रियेला कशी मदत करते, याचे नवे पैलू समोर आले आहेत.

"व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे स्नायूंर्जंरह मायटोकॉन्ड्रियामधील ऊर्जा निर्मितीवर परिणाम होतो, हे दाखवणारे हे पहिलेच संशोधन आहे.

वाढत्या वयाच्या उंदरांना बी१२ चे सप्लिमेंट्स देऊन पाहिले, तेव्हा त्यांच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले.

यापूर्वीची संशोधने मुख्यतः बी१२ च्या कमतरतेमुळे होणारे थेट परिणाम (उदा. ॲनिमिया, मज्जासंस्थेचे आजार आणि विसरभोळेपणा) यावर केंद्रित होती.

नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले की, शरीरात बी१२ ची थोड्या कमतरतेचा शरीरावर व्यापक दुष्परिणाम होऊ शकताे.

जगभरात, विशेषतः वृद्ध लोकांमध्ये आणि शाकाहारी लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता मोठ्या प्रमाणात आढळते.

नवीन संशोधन सांगते की, बी१२ ची कमतरता शरीराची ताणतणाव, आजारपण आणि वृद्धत्वाच्या परिणामांशी लढण्याची क्षमता कमी करते.

सध्याचे निष्कर्ष पेशी आणि प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांवर आधारित आहेत, आणि लवकरच मानवांवर याच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

येथे क्‍लिक करा.