Winter Foods : थंडीतही राहा फिट! जाणून घ्‍या इम्युनिटी वाढवणारे खाद्यपदार्थ

पुढारी वृत्तसेवा

थंडी सुरू झाली की शरीराला केवळ पांघरुणातूनच नाही, तर अन्नातूनही ऊब हवी असते.

योग्य जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांचे मिश्रण आपल्याला संपूर्ण हिवाळ्यात निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत करते.

तंतुमय पदार्थ (फायबर), खनिजे (मिनरल्स) आणि 'बी' जीवनसत्त्वाने परिपूर्ण असलेली बाजरीच्‍या भाकरीचा समावेश दिवसाच्‍या आरोग्यदायी सुरुवातीसाठी करा

बदाम आणि अक्रोड हे ओमेगा-३, जस्त (झिंक) आणि जीवनसत्त्व 'ई' ने समृद्ध असतात. ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध असलेला गूळ शरीराला उबदार ठेवतो आणि थंड महिन्यांमध्ये रोगप्रतिकारशक्तीला आधार देतो.

संत्री, लिंबू आणि आवळा जीवनसत्त्व 'सी' ने भरलेले आहेत. याचा आहारा समावेश केल्‍याने रोगप्रतिकारक पेशींना संसर्गाशी लढण्यास मदत होते.

मासे शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात. थंडीतील कोरडेपणात त्वचेला सजल (हायड्रेटेड) ठेवण्‍यास मदत होते.

पालक, मोहरी, मेथी आणि चाकवत यांसारख्या हंगामी पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्व 'ए', जीवनसत्त्व 'सी' आणि लोह (आयर्न) मुबलक प्रमाणात असते. या भाज्या संपूर्ण हिवाळाभर शरीराला मजबूत ठेवतात.

येथे क्‍लिक करा.