Benefits of Diary Writing : दररोज ५ मिनिटे डायरी लिहा, आश्‍चर्यकारक फायदे अनुभवा

पुढारी वृत्तसेवा

दररोज डायरी लिहिणे ही साधी सवय मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.

तणावपूर्ण विचार कागदावर उतरवल्याने मेंदूवरील चिंतांचा भार हलका होतो. अशा नोंदींमुळे मन अधिक शांत होते.

भावनांना शब्दांत मांडल्याने आपले स्वतःच्या भावनांबद्दलचे आकलन सुधारते. सातत्याने असे लेखन केल्याने कालांतराने भावनिक बुद्धिमत्ता विकसित होण्यास मदत होते.

आपले विचार कागदावर मांडल्याने विचारांतील गुंता सुटतो आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.

भावना लेखणीतून व्यक्त केल्याने कृतज्ञता, आत्म-चिंतन आणि सकारात्मक विचारसरणीला चालना मिळते.

रात्री झोपण्यापूर्वी लेखन केल्यास मन शांत झाल्यामुळे सहजपणे आणि लवकर झोप लागण्यास मदत होते.

आठवण्याची क्षमता सुधारते. घटनांचे चिंतन केल्याने शिकलेल्या गोष्टी अधिक दृढ होतात.

दररोज चिंताग्रस्त विचार कागदावर लिहिल्यास त्यांची तीव्रता कमी होते.तणाव व्‍यवस्‍थापन करणे अधिक सोपे जाते.

येथे क्‍लिक करा.