Summer Fitness Tips | उन्हाळ्यात फिट राहायचे? 'हा' व्यायाम ठरेल फायदेशीर

पुढारी वृत्तसेवा

लहान मुले ते वृद्धांपर्यंत पोहणे हा आरोग्यासाठी सर्वात प्रभावी आणि सर्वांगीण व्यायाम मानला जातो

पाण्यात उतरण्यापूर्वी हलका वॉर्म-अप करा, त्यामुळे शरीर सैल होऊन संभाव्य दुखापत टाळण्यास मदत होते

पोहताना घाम येत नाही, तरीही भरपूर पाणी प्या. सुरुवातीला १५-२० मिनिटे पोहण्याचा सराव करा. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवत न्या

पोहताना हात, पाय, पाठ आणि पोटाचे स्नायू एकाच वेळी काम करतात. त्यामुळे शरीराला चांगला आकार येऊन ताकद वाढण्यास मदत होते

पाण्यात शरीराचे वजन हलके वाटत असल्याने सांध्यांवर ताण येत नाही. त्यामुळे गुडघेदुखी किंवा सांधेदुखी रूग्णांसाठी पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे

पोहण्यामुळे हृदयाची गती वाढते आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते. नियमित पोहण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो

पोहण्यामुळे शरीरात 'एंड्रॉर्फिन' संप्रेरक स्त्रवते, परिणामी तणाव कमी होऊन मन फ्रेश होऊन चांगली झोप लागण्यास मदत होते

धावण्यापेक्षाही पोहताना मोठ्या प्रमाणात कॅलरी खर्च होतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी पोहण्याचा व्यायाम फायदेशीर ठरतो

शरीराचे तापमान नियंत्रित राहते आणि उन्हाळ्यातील थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटते. हाडे आणि सांध्यांवर ताण येत नाही

येथे क्लिक करा