Fitness Tips | फिट राहायचंय: मग वय आणि लिंगानुसार किती पुश-अप्स आवश्यक?

पुढारी वृत्तसेवा

पुश-अप्स हा साधा बॉडीवेट व्यायाम असून वरच्या शरीराची ताकद, कोअर स्थिरता आणि एकूण फिटनेस यांचे प्रभावी संकेत देतो

एका वेळेस तुम्ही किती पुश-अप्स करू शकता, यावरून तुमच्या शारीरिक आरोग्याबद्दल बरीच माहिती समोर येऊ शकते

कोणत्याही वयात पुरुष किंवा महिलांसाठी ‘आदर्श’ अशी सार्वत्रिक पुश-अप्सची संख्या नाही.

काही सर्वसाधारण मापदंड वरच्या शरीराच्या स्नायूंची सहनशक्ती मोजण्यासाठी मदत करू शकतात

निरोगी पुरुषाकडून २०–३० सामान्य पुश-अप्स अपेक्षित असू शकतात, तर त्याच वयोगटातील महिला १५–२० पुश-अप्स करण्याचे लक्ष्य ठेवू शकते

ठोबळमनाने 25 वय असणाऱ्या तरूण तरूणींनी प्रत्येकी २८ आणि २०, ६५ वय असणाऱ्यांनी १० आणि मध्यम वय असणाऱ्यांनी १६ ते १४ पुश-अप्स करावेत

वय वाढत गेल्यावर हे आकडे नैसर्गिकरीत्या कमी होत जातात. याचे कारण केवळ स्नायूंची घट नव्हे तर सांध्यांच्या मर्यादाही येतात

“पुश-अप्स हे वरच्या शरीरातील स्नायूंची सहनशक्ती, कोअर स्थिरता आणि खांद्यांच्या आरोग्याचे चांगले संकेतक आहेत

कंबर खाली झुकणे, कोपरे जास्त बाहेर जाणे किंवा पूर्ण हालचालीचा अभाव अशा चुका होतात. यामुळे व्यायामाचा फायदा कमी होतो आणि दुखापतीचा धोका वाढतो

येथे क्लिक करा