पुढारी वृत्तसेवा
घरातील कामे आणि पायऱ्या चढणे हासुद्धा एक उत्तम व्यायाम आहे, याने मूडही फ्रेश होतो!
'नेचर ह्युमन बिहेविअर' या जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, घरातील कामे करणे, किंवा थोडा वेळ चालणे अशा फक्त ५ ते १० मिनिटांची हालचाल तुमचा मूड बदलू शकते.
छोट्या-छोट्या हालचालींमुळे आपले भावनिक आरोग्य सुधारते, असे नवीन अभ्यासात समोर आले आहे.
हालचाल केल्याने शरीरात डोपामाइन आणि एंडोर्फिन रसायने वाढतात,यामुळे तुम्हाला आणखी काम करण्याचा उत्साह येतो.
आतापर्यंत फक्त जिमच्या कठीण वर्कआउटला व्यायाम मानले जात होते, पण स्मार्ट वॉचच्या डेटाने ही व्याख्या बदलली आहे.
फरशी पुसणे, लिफ्ट ऐवजी पायऱ्या वापरणे हासुद्धा प्रभावी व्यायाम आहे.
तज्ज्ञांच्या मते, बागेत थोडा वेळ चालण्याने रक्तदाब आणि तणाव संप्रेरक कमी होतात.
धावणे जमत नसेल तर फक्त चाला, ब्रश करताना उठा-बशा काढा. छोट्या गोष्टींनीच मोठा बदल घडतो, असे नवे संशोधन सांगते.
व्यायाम करण्याची इच्छा होईल तेव्हा करू, असा विचार करू नका. कृती आधी करा, इच्छा नंतर आपोआप होईल.