पुढारी वृत्तसेवा
केळी पचायला सोपी असतात. बिघडलेले पोट शांत करण्यास मदत करतात.
साध्या दह्यामध्ये 'प्रोबायोटिक्स' असतात, जे पचनक्रिया निरोगी ठेवतात आणि पोटाचे आरोग्य सुधारतात.
ओट्स पोटासाठी हलके असतात आणि त्यातील फायबर पचनक्रियेला मदत करते.
खिचडी हा एक हलका आहार आहे. त्यामुळे पोट बिघडलेले असताना अनेकदा खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
उकडलेला भात (पांढरा भात) साधा, कमी मसाल्यांचा असतो. तो पचनशक्ती कमकुवत असताना पोट शांत ठेवण्यास मदत करतो.
पपईमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स (पाचक रस) असतात, ते अन्न पचवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
इडली मऊ, हलकी आणि पोटासाठी उत्तम असते. तो नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय ठरतो.
व्हेजिटेबल सूप (भाज्यांचे सूप) पचनसंस्थेसाठी हलके असते, तसेच यामुळे शरीराला पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे मिळतात.