Squats Benefits : व्यायामशाळेत न जाताही राहा फिट; 'स्क्वाट्स'चे ८ जबरदस्त फायदे माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

स्क्वाट्स केल्याने मांड्या, हॅमस्ट्रिंग्स आणि हिप्सचे स्नायू मजबूत होऊन पायांची ताकद वाढते.

नियमित स्क्वाट्स मारल्याने शरीराला आधार देणारे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे शरीराचा बॅलन्स आणि स्थिरता वाढते.

या व्यायामामुळे कोअर (Core) स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे दैनंदिन कामे करताना उठण्या-बसण्याची पद्धत (Posture) योग्य राहते.

रोज स्क्वाट्स केल्याने ग्लूट्स आणि हिप्सच्या सभोवतालचे स्नायू मजबूत होतात.

स्क्वाट्स करताना कंबर, गुडघे आणि पायाच्या घोट्यांची हालचाल होते; योग्य पद्धतीने केल्यास शरीराची फ्लेक्सिबिलिटी सुधारते.

खाली बसणे, उठणे किंवा एखादी वस्तू उचलणे यासारख्या रोजच्या क्रिया स्क्वाट्समुळे सोप्या होतात.

नियमित स्क्वाट्स केल्याने थकवा लवकर जाणवत नाही.

स्क्वाट्समुळे स्नायूंची सहनशक्ती वाढते. तसेच ताकद वाढते.

टीप : तुम्हाला पाठीचा, कंबरेचा किंवा गुडघ्यांचा त्रास असल्यास कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी फिटनेस ट्रेनर किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

येथे क्‍लिक करा.