Spring Onion Benefits: आरोग्याचा खजिना आहे 'कांदा पात'; जाणून घ्या ७ फायदे

पुढारी वृत्तसेवा

कांदा पात हा काही म्हणजे केवळ जेवणाची सजावट करण्याचा पदार्थ नाही.

जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरने भरपूर असणारी कांदा पात तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

यामध्‍ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असते, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि शरीराचे इन्फेक्शन (संसर्गापासून) रक्षण करते.

यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करण्यास आणि रक्तभिसरण प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.

यामध्‍ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.

यातील व्हिटॅमिन 'के' (Vitamin K) असते, जे हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक पोषक घटक आहे.

कांदा पातमध्ये असलेले व्हिटॅमिन 'ए' आणि कॅरोटीनॉइड्स डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.

यातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील 'फ्री रॅडिकल्स'शी लढण्यास मदत करतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात.

येथे क्‍लिक करा.