पुढारी वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.
कारेगाव–कान्हूर मेसाई गणातून त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवत होत्या.
समोर होत्या मनीषा सतीश पाचंगे आणि अखेर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने नवले यांचा तब्बल 300 मतांनी पराभव केला.
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या निर्मला नवले यांना ‘रिल्सची क्विन’ म्हणूनही ओळखले जाते.
रिल्स, व्हिडीओ आणि वेगळ्या स्टाईलमुळे त्या कायम व्हायरल असायच्या. त्यांच्या प्रत्येक पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळायच्या.
इतकंच नाही, त्या आयटी इंजिनिअर आहेत. काही वर्षांपूर्वी त्या कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या होत्या.
इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गावपातळीवरील काम आणि ऑनलाइन लोकप्रियतेमुळे त्या चर्चेत होत्या.
मात्र या निवडणुकीत सोशल मीडिया स्टारडम मतपेटीत उतरलं नाही. लोकप्रियता आणि प्रत्यक्ष मतं यात मोठा फरक दिसून आला.
हा निकाल केवळ निर्मला नवले यांच्यासाठीच नाही, तर त्यांच्या चाहत्यांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.