Social Media Psychology |सोशल मीडियावर 'मौन' राहणाऱ्यांबाबत मानसशास्त्र काय म्हणते?

पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर मौन असणार्‍यांबाबत मानसशास्‍त्राने केलेल्‍या अभ्‍यासा अनेक सकारात्‍मक बाबी समोर आल्‍या आहेत.

अमेरिकेतील नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटीमध्‍ये झालेल्‍या संशोधनानुसार, सोशल मीडिया वापरणाऱ्यांपैकी तब्बल ९०% लोक हे 'लर्कर्स' (Lurkers) असतात.

लर्कर्स म्‍हणजे ते पोस्‍ट किंवा कमेंट न करता केवळ मजकूर पाहतात. ते फक्त बघतात.

मानसशास्त्र असे सांगते की, जे लोक सोशल मीडिया वापरतात पण कधीच पोस्ट किंवा कमेंट करत नाहीत, ते निष्क्रिय नसतात.

अशा व्‍यक्‍तीने 'दिखाव्या'च्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला असतो. नियमित पोस्ट करणाऱ्या बहुतेकांनी असा विचारही कधी केलेला नसतो.

२०२४ मध्‍ये मानसशास्‍त्रातील एका संशोधनानुसार, अनेक लोक गोपनीयतेसाठी किंवा 'सोशल मीडिया थकवा' टाळण्यासाठी मौन राहणे पसंत करतात.

संशोधन असेही सांगते की, सोशल मीडियाचा वापर कमी केल्याने तरुणांमधील नैराश्याची लक्षणे २४% आणि चिंता १६% ने कमी होतात.

मानसशास्‍त्रीय संशोधनानुसार, सोशल मीडियावर मौन राहणे हा आळस नाही. तर प्रेक्षक न बनता केवळ निरीक्षक राहण्याचा एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे.

येथे क्‍लिक करा.