आळस झटकायला फक्त ५ सेकंद पुरेसे! जाणून घ्या काय आहे '5 Second Rule' ?

पुढारी वृत्तसेवा

तुम्हाला आळस झटकून काम करायचे आहे असे वाटते, तेव्हा ५ ते १ पर्यंत उलट मोजणी करा आणि १ म्हणताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा.

मॅल रॉबिन्स यांचा '५ सेकंद नियम'मागे मेंदू विज्ञान आणि वर्तणूक मानसशास्त्राचा आधार आहे.

मॅल रॉबिन्स यांनी २०११ मध्‍ये एका 'TEDx' टॉक मध्ये पहिल्यांदा ५-सेकंद नियमाचा उल्लेख केला. आजही तो जगातील सर्वाधिक पाहिलेल्या TED टॉकपैकी एक आहे.

५ ते १ उलट मोजल्याने मेंदूचा 'प्रीफ्रंटल कॉर्टेक्स' भाग सक्रिय होतो. तो तुम्‍हाला निर्णय घेण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो.

आपलं मन नेहमी 'आराम' शोधतं. हा नियम आपल्याला आपल्या भावनांच्या पलीकडे जाऊन गरजेचं आहे, ते करण्यासाठी प्रेरित करतो.

कोणत्याही कामात सर्वात कठीण असते ती 'सुरुवात'. हा ५ सेकंदांचा 'पुश' सुरुवातीचा जडपणा घालवण्यासाठी पुरेसा असतो.

अतिविचार हा कृतीचा शत्रू आहे. ५ सेकंदात निर्णय घेतल्याने मेंदूला भीती किंवा आळस निर्माण करायला वेळच मिळत नाही.

सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे किंवा अन्‍य लहान गोष्टींपासून '५ सेकंद नियम'चा सराव सुरू करा. फरक अनुभवा.

येथे क्‍लिक करा.