Social media impact on relationships : ‘त्यांचं नातं किती परफेक्ट!’ असं वाटतंय? सोशल मीडियामुळे तुमच्या रिलेशनशिपवरही परिणाम होतोय का?

पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर इतर कपल्सचे रोमँटिक फोटो पाहून तुमचं नातं कमीपणाचं वाटतंय का?

‘त्यांचं नातं किती परफेक्ट!’ असा विचार वारंवार मनात येत असेल, तर त्यामागे सोशल मीडियाचा मोठा प्रभाव असू शकतो.

इंस्टाग्रामवर दिसणारं प्रत्येक नातं खरंच तितकं आनंदी आणि परफेक्ट असतं का?

इतरांच्या नात्याशी स्वतःच्या रिलेशनशिपची तुलना केल्याने असमाधान, मत्सर आणि अपेक्षा वाढू शकतात.

कपल्सचे सततचे रोमँटिक पोस्ट पाहिल्याने आपल्या पार्टनरकडूनही तशाच गोष्टींची अपेक्षा निर्माण होऊ शकते.

सोशल मीडियावर लोक आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण दाखवतात; मात्र नात्यातील मतभेद आणि संघर्ष अनेकदा दिसत नाहीत.

‘आपलं नातंही असंच असायला हवं’ या अपेक्षेमुळे प्रत्यक्ष नात्यातील छोट्या गोष्टीही अपुऱ्या वाटू शकतात.

म्हणूनच सोशल मीडियावरील ‘परफेक्ट कपल्स’पेक्षा तुमच्या नात्यातील संवाद, विश्वास आणि समाधानाला अधिक महत्त्व द्या.

येथे क्लिक करा...