Asit Banage
पचनास हलके आणि पोषक घटकांच्या उत्तम शोषणासाठी हिवाळ्यात सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाणे अधिक चांगले ठरते.
शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात असतात.
तेलात तळण्याऐवजी कोरडे भाजलेले शेंगदाणे निवडा.
भाजलेले शेंगदाणे पौष्टिक स्नॅक्ससाठी चांगला पर्याय ठरतात.
सकाळच्या नाश्त्यात भिजवलेले शेंगदाणे खाऊ शकता.
संध्याकाळच्या भुकेसाठी कोरडे भाजलेले शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते.
दिवसातून २५ ते ३० ग्रॅम शेंगदाणे खाणे पुरेसे आहे.
शेंगदाण्याची ॲलर्जी असल्यास त्यांचे सेवन टाळावे.