Gut Health Study : एक कप कॉफी पिल्‍याने पचनसंस्थेत कोणता बदल होतो? नवीन रिसर्च काय सांगतो?

पुढारी वृत्तसेवा

तुमचा रोजचा कॉफीचा कप केवळ उत्साह देत नाही, तर थेट तुमच्या पचनसंस्थेच्या कार्यपद्धतीवरही परिणाम करत असू शकतो.

file photo

कोपनहेगन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पचनमार्गातील हालचाली टिपण्यासाठी लहान इलेक्ट्रॉनिक कॅप्सूलचा वापर करून नवा अभ्यास केला.

संशोधकांनी आठ दिवसांच्या नोंदीवरून सहभागींचे 'वारंवार कॉफी पिणारे' (३ दिवसांपेक्षा जास्त दिवस दररोज १ ते ५ कप) आणि कमी कॉफी पिणारे असे गट केले.

तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस रोज एक ते पाच कप कॉफी पिणाऱ्यांचा समावेश 'वारंवार कॉफी पिणाऱ्यांच्या' गटात करण्यात आला.

वारंवार कॉफी पिणाऱ्यांच्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांमध्ये (गट मायक्रोबायोम) अधिक विविधता दिसून आली आहे.

Pudhari

कॉफीमुळे केवळ आतड्यांतील जिवाणूच नाही, तर आतड्याच्या प्रत्यक्ष शरीरक्रियाविज्ञानावरही परिणाम होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

जास्त कॉफी पिणाऱ्यांच्या लहान आतड्यातील स्थिती अधिक आम्लधर्मी (ॲसिडिक) असल्याचे अभ्यासात आढळले आहे.

नियमित कॉफी सेवनाचा मोठ्या आतड्यातील स्नायूंच्या वाढत्या आकुंचनांशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

Coffee | Pudhari

आतड्यातील ही आकुंचने बद्धकोष्ठता टाळण्यास आणि निरोगी पचनास मदत करू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात.

लहान आतड्यातील वाढलेली आम्लता फायदेशीर की तोट्याची, याबाबत अद्याप अधिक संशोधनाची गरज असल्‍याचेही संशोधकांनी स्‍पष्‍ट केले आहे.

येथे क्‍लिक करा.