'सन मराठी' वाहिनीवर १४ जुलैपासून 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' नवी मालिका येतेय.मालिकेत तेजा-वैदहीसह आणखी एक दमदार भूमिका म्हणजे माई साहेब.ही भूमिका अभिनेत्री स्नेहलता वसईकर साकारणार आहे .स्नेहलता म्हणाली, 'मी माईसाहेब ही खलनायिकेची भूमिका साकारतेय'.'ती मुलावर नितांत प्रेम करणारी, राजकारणातील डावपेच खेळणारी, कर्तबगार आहे'.'माझ्या वयापेक्षा जास्त वय असलेली ही भूमिका आहे' .'मी स्वतःशी ठरवलं होतं की, वयापेक्षा मोठी व्यक्तिरेखा साकारायची नाही'.'पण मी माईसाहेब या पात्राच्या प्रेमात पडले आहे' .विनोद लवेकर यांचे दिग्दर्शन असून नाशिकमध्ये शूटिंग सुरू आहे .ती म्हणाली, ''माझी मुलगी शौर्या आता १२ वर्षांची आहे'' ."मम्मा तुला खतरनाक रोल करायला मिळतोय, तू नक्की कर" .तिच्या आणि माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळेच मी ही भूमिका आनंदाने करत आहे".'लव्ह बर्ड्स' १२ वर्षांनी पुन्हा एकत्र; प्रिया-उमेश येताहेत ‘या’ चित्रपटातून