Snake Prevention Tips | घराजवळ साप येतात: 'या' वासांनी जातील पळून

अविनाश सुतार

साप हा अतिशय धोकादायक प्राणी आहे. विषारी असल्याने तो प्राणघातक असतो

तुमच्या घराजवळ उद्यान, जंगल, तलाव असेल तर सापांची भीती अधिक असते

सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो, परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही

काही विशिष्ट वास सापांना अजिबात आवडत नाहीत. त्या वासामुळे ते पळ काढतात?

पुदिना आणि तुळशीचा वास सापांना सहन होत नाही. घरात किंवा बागेत ही झाडे लावल्यास परिसरही सुगंधित राहतो. आणि साप पळून जातात

लसूण आणि कांदा ठेचून टाकू शकता, किंवा पाण्यात मिसळून भिंतीजवळ व दरवाज्याजवळ फवारू शकता. तीव्र वासामुळे साप घराजवळ येत नाहीत

साप धुराबाबत खूप संवेदनशील असतात. वाळलेली पाने किंवा अगरबत्ती जाळल्याने साप दूर राहण्यास मदत होते

लिंबाचा रस, व्हिनेगर आणि दालचिनी तेलाचे काही थेंब मिसळून हे मिश्रण समान प्रमाणात घराभोवती फवारावे. याचा वास सापांना दूर ठेवण्यास मदत करतो

अमोनियाचा तीव्र वास सापांना आवडत नाही. साप येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अमोनियाचे छोटे डबे ठेवले तर साप दूर राहतात

येथे क्लिक करा