पुढारी वृत्तसेवा
रताळी हे केवळ चविष्ट कंदमूळ नसून पोषणतत्त्वांचा खजिनाच आहेत
फायबर, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेला हा साधा कंद दररोज मर्यादित खाल्ल्यास आरोग्यात मोठे बदल घडवू शकतो
रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यातील फायबर साखरेचे शोषण हळूहळू होण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते
बीटा कॅरोटीन, जीवनसत्त्व C आणि मॅंगनीजने भरपूर असल्यामुळे रताळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात
जांभळ्या गोड रताळीमध्ये अँथोसायनिन्स असतात, जे स्मरणशक्ती सुधारण्यास, मेंदूच्या पेशींना नुकसानापासून संरक्षण देतात
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हळूहळू ऊर्जा मुक्त करतात, ज्यामुळे दिवसभर सक्रिय आणि ऊर्जावान राहण्यास मदत होते
पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे रताळी रक्तदाब नियंत्रित ठेवते, शरीरात पाणी साठणे कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास उपयुक्त
उच्च फायबरमुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, भूक आणि खाण्याची इच्छा कमी होते, आणि नैसर्गिकरीत्या वजन कमी करण्यास मदत होते