सापांना अन्न किंवा आसरा मिळेल अशा वाळवीचे ढिगारे, उंदरांची बिळे आणि खड्डे बुजवून घ्या .शेतात किंवा घर, बागेतील ओलसर कोपऱ्यांमध्ये काम करताना खबरदारी घ्या.वाळवीचे ढिगारे, उंदरांची बिळे किंवा जमिनीतील खड्डे येथे काम करणे टाळा .जमिनीवर झोपायची सवय असेल तर आजूबाजूची नीट पाहणी करा. शक्य असल्यास पलंग किंवा खाटेवर झोपा आणि जवळ टॉर्च ठेवा . उंदीर सापांना आकर्षित करतात. त्यामुळे घरात साप येऊ नयेत म्हणून उंदरांचा बंदोबस्त करा .घर स्वच्छ ठेवा, भेगा-फटी बंद करा आणि उंदरांचा वावर टाळा, कोरडी पाने, लाकूड किंवा गवत घराजवळ साठवून ठेवू नका.खिडक्यांना जाळी लावा, नाले झाका आणि उंदरांच्या प्रवेशासाठी असलेली भोकं बंद करा.सापांना कोरड्या पानांमध्ये, लाकडाच्या ओंडक्यांमध्ये, कडबा-गवतामध्ये किंवा जास्त वाढलेल्या गवतामध्ये लपायला आवडते .बाहेर काम करताना नेहमी योग्य पादत्राणे वापरा, रात्री टॉर्च जवळ ठेवा, वाट व झोपायची जागा तपासा.येथे क्लिक करा