India last railway station |भारताचे शेवटचे रेल्वे स्टेशन कोणते?

पुढारी वृत्तसेवा

भारतीय रेल्वेचे विस्तीर्ण जाळे डोंगरदऱ्या, वाळवंट, घनदाट जंगले आणि सीमावर्ती भागांत आहे.

भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन प. बंगाल राज्यातील सिंघाबाद (Singhabad) आहे.

हे स्टेशन देशाच्या रेल्वे नकाशावर पूर्वेकडील टोकाला असून बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी अलीकडे आहे.

या बिंदूनंतर भारतीय रेल्वेचे रूळ परकीय हद्दीत प्रवेश करतात, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सिंगाबाद हे या दिशेने जाणारे भारतीय रेल्वेचे अंतिम स्थानक ठरते.

सिंघाबाद रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेजवळ वसलेले आहे.

ब्रिटिश काळापासून सीमापार वाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व राहिले आहे.

आजही रेल्वे लाईन सिंगाबादच्या पलीकडे बांगलादेशात जाते, परंतु भारतीय रेल्वेची अधिकृत कार्यकक्षा याच ठिकाणी संपते.

याचे महत्त्व व्यावसायिक नसून भौगोलिक आणि धोरणात्मक (Strategic) आहे. त्यामुळेच हे स्टेशन देशातील कमी परिचयाचे पण अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जाते.

येथे क्‍लिक करा.