Snake Mimic Caterpillar | सापाचे रुप घेऊन घाबरवणारा सुरवंट

Namdev Gharal

स्नेक मिमिक कॅटरपिलर निसर्गातील एक फसवणारा सुरवंट आहे. जो सुरवंट असूनही सापाची मिमिक्री करतो.

हा सुरवंट धोका दिसत असला की आपले डोके फुलवून सापासारखे तयार करतो. व यावर नकली डोळ्यांची आकृती तयार होते.

शिकारी ही घाबरतोः हा सुरवंट इतकी भारी सापाची ॲक्टींग करतो व रुप धारण करतो की शिकारीही हे पाहून घाबरुन जातात

हा सुरवंट विषारी नसतो पण जेव्हा सापाचे रुप घेतो त्‍यावेळी, तो एखाद्या विषारी सापासारखा दिसतो व त्‍याच पद्धतीने हालचाली करतो

पक्षी किंवा इतर शिकारी या सुरवंटाला खायला येतात, तेव्हा तो सापासारखा आकार बदलतो आणि त्यांना घाबरवतो

snake mimic caterpillar म्हणजेच हा सुरवंट प्रत्यक्षात एका फुलपाखराची अळी असते. मोठं झाल्यावर ती सुंदर फुलपाखरू बनते.

हा सुरवंट प्रामुख्याने आशिया, दक्षिण अमेरिकेतील व काही उष्णकटिबंधीय भागांत आढळतो

ही अळी/ सुरवंट झाडांच्या पानांवर राहते आणि पाने कुरतडत राहते

हा सुरवंट “Darwinian mimicry” चं एक अप्रतिम उदाहरण आहे — म्हणजे एक प्राणी दुसऱ्या धोकादायक प्राण्यासारखा स्वतःला भासवतो.

एका अभ्यासानुसार सापासारखा देखावा दाखवल्यावर ९०% शिकारी या सुरवंटावर हल्ला करत नाहीत असे दिसून आले आहे.

शॅम्पू तयार करणारे फूल