Namdev Gharal
Bitter Ginger Flower ला Shampoo Ginger असे म्हणतात. ही आलं कुटुंबातील एक औषधी वनस्पती आहे.
या झाडाला लालसर-हिरव्या रंगाचे फुले येतात जी झुबक्यासारखी दिसतात आणि त्यातून रस बाहेर येतो. हा रस म्हणजे केसांसाठीचा नैसर्गिक शॅम्पू
या शॅम्पूमध्ये bitter ginger (कडू आलं) व ginger flower extract हे नैसर्गिक घटक असतात, जे केसांना पोषण देतात.
केसगळती कमी करणे: या फुलांमधील नैसर्गिक घटकांमुळे टाळूतील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे केसगळती कमी होते आणि नवीन केसांची वाढ होते.
ही वनस्पती दक्षिण-पूर्व आशिया (विशेषतः इंडोनेशिया, मलेशिया आणि हवाई) येथे मूळची आहे.
आयुर्वेद आणि हवाईयन पारंपरिक औषधात याचा वापर डोकेदुखी, त्वचारोग आणि पचनाच्या समस्यांवर केला जातो.
या शॅम्पूमधील प्रतिजैविक (antibacterial) गुणधर्मामुळे कोंडा कमी होतो.
कडू आलं फुलाच्या मुळांमध्ये anti-inflammatory, antibacterial आणि antioxidant गुणधर्म असतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत.
केसांना चमक: यात नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स असल्याने केसांना नैसर्गिक चमक आणि मऊपणा येतो.
रसायनमुक्त शॅम्पू : बर्याच ब्रँडमध्ये या फूलांतील रसाचा वापर करुन paraben-free, sulphate-free शॅम्पू तयार केला जातो. त्यामुळे तो सर्व प्रकारच्या केसांसाठी सुरक्षित असतो.