Snake Milking |जगातील सर्वात धोकादायक जॉब : क्षणाक्षणाला असतो मृत्‍यूचा धोका!

Namdev Gharal

जगभरात अनेक प्रकारचे जॉब असतात. ऑफिस जॉब, फॅक्ट्रीमधील जॉब पण जगात अशीही एक नोकरी आहे की जिथे प्रत्‍येक सेकंदाला मृत्‍यूचा धोका असतो

हा जॉब म्हणजे 'Snake Milking' यामध्ये सापाचे दुध काढणे असा अर्थ होत नाही तर स्नेक मिल्कींग म्हणजे सापांचे विष काढणे होय ही धोकादायक व आव्हानात्‍मक नोकरी मानली जाते

या कामात सापांच्या विषग्रंथींमधून विष गोळा करण्याचे काम केले जाते, ज्या विषाचा उपयोग प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रासाठी होतो.

ज्याप्रमाणे गाईचे दूध काढले जाते, त्याप्रमाणे सापाच्या विषग्रंथींमधून विष बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला 'मिल्किंग' म्हणतात. हे विष अत्यंत मौल्यवान असते कारण ते अनेक जीवघेण्या आजारांवर औषध म्हणून वापरले जाते.

हे काम करणारा तज्ज्ञ व्यक्ती (Snake Milker) सापाला डोक्याजवळून अशा प्रकारे पकडतो की सापाला इजा होणार नाही आणि तो चावू शकणार नाही. हे खूप कौशल्याचे काम आहे.

यानंतर सापाचे दात (Fangs) एका काचेच्या पात्रावर किंवा प्लास्टिकचे आवरण असलेल्याव डबीवर ठेवले जाते सापाच्या विषग्रंथींना हलका दाब दिला जातो, ज्यामुळे विषाचे थेंब पात्रात जमा होतात.

इतके जीवघेणे काम का केले जाते ? कारण यांच्या कामामुळेच सर्पदंश झालेल्या अनेकांचे प्राण वाचू शकतात कारण याच विषापासून अँटी-व्हेनम Anti-venomतयार केले जाते.

त्‍याचबरोबर हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि अगदी कर्करोगाच्या (Cancer) उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांमध्ये सापाच्या विषाचा काही प्रमाणात केला जातो.

हा सामान्य जॉब नाही यासाठी प्राणीशास्त्र (Zoology), जीवशास्त्र (Biology) किंवा हर्पेटोलॉजी (Herpetology - सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास) मध्ये पदवी घेणे आवश्यक असते.

सापांना हाताळण्याचे अनेक वर्षांचे कठीण प्रशिक्षण घ्यावे लागते. एका सेकंदाची चूक देखील जीवघेणी ठरू शकते, त्यामुळे प्रचंड एकाग्रता लागते.

स्नेक मिल्किंग हे काम अत्यंत दुर्मिळ आहे तसेच विष हे अत्‍यंत महाग असल्याने यात चांगली कमाई होते. एका ग्रॅम विषाची किंमत हजारो डॉलर्समध्ये असू शकते.

सापांना ‘मॅगी’सारखा खाणार पक्षी