Namdev Gharal
उत्तर अमेरिकेत एक मोठा बगळा आढळतो ज्याचे नाव आहे ग्रेट ब्ल्यु हेरॉन Great Blue Heron याची उंची 3 ते 4 फूट असते तर पंखाचा फैलाव 6 फुटापर्यंत असतो.
त्याच्या अवाढव्य आकारामुळे आणि शिकारीच्या कौशल्यामुळे ओळखला जातो. हा पक्षी प्रामुख्याने मासे खातो, पण जेव्हा तो सापाची शिकार करतो, तेव्हा ते दृश्य खरोखरच थक्क करणारे असते.
याची साप खाण्याची पद्धत आश्चकारक असते. सापांना ठार करुन अगदी आरामात हळू हळे गिळतो. जसे कोणी चवीने मॅगी खात आहे.
यांची नजर इतकी तीक्ष्ण असते की, पाण्यात किंवा गवतात लपलेला छोटासा हालचाल करणारा सापही यांना चटकन दिसतो.
तेव्हा तो अत्यंत संयमाने शिकार करतो हा पक्षी पुतळ्यासारखा तासन् तास उभा राहू शकतो. साप जेव्हा त्याच्या टप्प्यात येतो, तेव्हा तो विजेच्या वेगाने आपली लांब मान पुढे झटकतो.
बगळा सापाला त्याच्या तलवारीसारख्या अणकुचीदार चोचीने पकडतो. कधीकधी तो सापाला चोचीने थेट आरपार टोचतो, ज्यामुळे साप अर्धमेला होतो.
एकदा याच्या चोचीत साप सापडला की त्याचे सुटणे मुश्किल असते.साप स्वतःला वाचवण्यासाठी बगळ्याच्या चोचीला किंवा मानेला विळखा घालण्याचा प्रयत्न करतो.
परंतु, बगळ्याची मान लांब आणि लवचिक असल्याने तो सापाला सतत हवेत झटकून त्याला जमिनीवर किंवा पाण्यावर आपटतो व ठार करतो
बगळा सापाचे डोके आपल्या चोचीने जोरात दाबतो किंवा सापाला वारंवार पाण्यात बुडवतो. साप मेला आहे याची खात्री झाल्याशिवाय तो त्याला गिळत नाही.
साप खाताना त्याच्या डोक्याकडून गिळायला सुरुवात करतो. यामुळे सापाचे शरीर सरळ रेषेत राहते आणि त्याच्या शरीरावरील खवले किंवा हाडे बगळ्याच्या घशात अडकत नाहीत.
मोठा साप गिळताना हेरॉन बगळ्याची मान सापाच्या आकारामुळे फुगलेली दिसू शकते . कधीकधी पूर्ण साप पोटात जाण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागू शकतात. त्यामुळे तोडांत लोंबकळत असलेला साप मॅगीसारखा दिसतो.
blue heron च्या पोटातील पाचक रस अत्यंत तीव्र स्वरुपाचे असतात. ते सापाची हाडे, कातडी आणि मांस पूर्णपणे पचवू शकतात.
हा पक्षी फक्त बिनविषारीच नाही, तर कधीकधी लहान विषारी सापांचीही शिकार करतो. मात्र, चुकून जार विषारी सापाने चोचीच्या बाहेर असलेल्या भागावर दंश केला, तर बगळ्याचा मृत्यूही होऊ शकतो.
या पक्ष्याची आणखी एक गोष्ट म्हणजे म्हणजे इतका मोठा असूनही याचे वजन फक्त २ ते २.५ किलो असते, कारण याची हाडे पोकळ असतात.