पुढारी वृत्तसेवा
तिरूपती बालाजी हे जगत्पालक विष्णुचे स्वरूप आहे.
आध्र प्रदेशातील चित्तुर जिल्ह्यात तिरूमला पर्वतावर श्री व्यकंटेश्वरा स्वामीचे मंदिर आहे.
आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक तिरूपतीला केस दान करून तिरूपतीचे दर्शन घेतात.
भाविकांची अशी श्रद्धा आहे की, तिरूपतीला केसांचे दान केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
म्हणूनच भाविक तिरूपतीमध्ये गेल्यावर सर्वप्रथम केश कर्तनालय मंडममध्ये जाउन केस दान करतात. यासाठी त्यांना मोफत कुपनही दिले जाते.
यानंतर स्नान करून मुंडन केलेल्या डोक्याला चंदन लावून भाविक तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जातात..
भगवान तिरूपती बालाजी यांच्यावर कर्ज आहे अशी पौराणिक आख्यायिका आहे. तिरूपतीमध्ये जो भाविक केसांचे दान करतो, तो तिरूपतीचे कर्ज कमी करतो अशी मान्यता आहे.
तर तिरूपतीमध्ये जाउन केस दान करणे म्हणजे डोक्यावरचे कर्ज उतरून येणे असेही मानतात. त्यामुळे केस दान करतात आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर तिरूपतीच्या दर्शनासाठी भाविक जातात.
तिरूपती देवस्थान हे भारतातील सर्वात मोठे देवस्थान असून भारतच नाही तर जगभरातून भाविक तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी आधी काही महिने बुकींग करावे लागते.