पुढारी वृत्तसेवा
सिगारेट सोडणं इतकं कठीण का?
लोक सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करतात, पण पुन्हा त्याच सवयीकडे वळतात. यामागचं खरं कारण काय?
भारतामध्ये 26 कोटी लोक तंबाखू सेवन करतात
WHO च्या माहितीनुसार, भारतात आजही कोट्यवधी लोक सिगारेट किंवा तंबाखूचं सेवन करतात.
100 पैकी 95 लोक पुन्हा Smoking सुरू करतात
तज्ज्ञ सांगतात, सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी बहुतेक लोक काही दिवसांत किंवा आठवड्यांत पुन्हा सिगारेट ओढू लागतात.
ही फक्त सवय नाही, Addiction आहे!
निकोटीनची लत शरीर आणि मेंदू दोन्हींवर परिणाम करते. त्यामुळे केवळ इच्छाशक्तीवर Smoking सोडणं कठीण जातं.
निकोटीनच सर्वात धोकादायक असतं?
तज्ज्ञांच्या मते, सिगारेटमधील सर्वात मोठा धोका फक्त निकोटीन नाही, तर तंबाखू जळताना निर्माण होणारे विषारी रसायनं आहेत.
Smoking सोडताना शरीर काय करतं?
चिडचिड, डोकेदुखी, झोप न लागणं, वारंवार सिगारेटची इच्छा होणं हे Symptoms अनेकांना त्रास देतात.
Nicotine Gum खरंच मदत करते?
Nicotine gum आणि lozenges सारख्या थेरपीमुळे सिगारेट सोडण्याची शक्यता 50 ते 70% पर्यंत वाढू शकते.
युवकांवर Smoking चा मोठा परिणाम
सिगारेटमुळे कमी स्टॅमिना, लवकर दम लागणं, खराब झोप आणि फिटनेस कमी होणं अशा समस्या तरुणांमध्ये वाढत आहेत.
सिगारेट सोडायचं ठरवलंय? हे लक्षात ठेवा
एकट्याने झगडण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला, सपोर्ट सिस्टम आणि योग्य थेरपी मदत करू शकते.
Smoking सोडणं कठीण आहे… पण अशक्य नाही!
आजचा छोटा निर्णय भविष्यात मोठा बदल घडवू शकतो. आरोग्याला प्राधान्य द्या.