Anirudha Sankpal
वृद्धापकाळाची समस्या नाही
अनेकांना हा गैरसमज असतो की संधिवात हा फक्त म्हातारपणात होतो, पण हा आजार कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो.
स्मोकिंग आणि आर्थराइटिसचा थेट संबंध
स्मोकिंगमुळे शरीरातील ऊतींमध्ये रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे हाडांचे आरोग्य बिघडते आणि 'ह्रयूमेटाइड आर्थराइटिस'चा धोका वाढतो.
जीवनशैलीत बदल करून नियंत्रण शक्य
वजन नियंत्रणात ठेवणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि योग्य वैद्यकीय सल्ल्यामुळे वाढत्या वयातील आर्थराइटिसच्या लक्षणांना कमी करता येऊ शकते.
व्यायामाचा फायदा
योग्य प्रकारचा व्यायाम (उदा. चालणे, सायकलिंग, स्ट्रेचिंग) केल्याने सांधे डॅमेज होत नाहीत, तर स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढते.
बोटे मोडण्याचा संबंध नाही
बोटे, हात किंवा पायाची हाडे चटकवल्याने आर्थराइटिस होतो, असा कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा अभ्यास नाही.
दीर्घकाळ बेड रेस्ट अयोग्य
सांधेदुखीत सतत बेड रेस्ट घेतल्याने हाडे ताठ होतात आणि स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे वेदना असतानाही डॉक्टरांच्या सल्ल्याने हालचाल सुरू ठेवावी.
विविध प्रकार आणि उपचार
आर्थराइटिसमध्ये गाउट, ऑस्टियोआर्थराइटिस, ह्रयूमेटाइड आर्थराइटिस यांसारखे विविध प्रकार असतात, ज्यांचे निदान व उपचार वेगवेगळे असतात.
तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
सांध्यांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी ऑर्थोपेडिक स्पेशलिटची भेट घेऊन योग्य तो उपचार व काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.