PLOS One ने केलेल्या सर्वेक्षणात 66 टक्के सहभागींनी शौचालयात स्मार्टफोन वापरत असल्याचे सांगितले . 37.3 टक्के लोकांनी शौचालयात पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवला, तर फक्त 7.1 टक्के लोकांनी फोन वापरला नाही .शौचालयात फोन वापरणाऱ्यांमध्ये मूळव्याधाचा धोका 46 टक्के जास्त असल्याचे डॉक्टरांना आढळून आले .पेल्विक फ्लोअर किंवा पेरिनियमला आधार न देता दीर्घकाळ बसल्याने गुदद्वाराच्या नसांवर दाब वाढतो .नसांवर दाब वाढल्यानंतर पुढील टप्प्यात सूज, वेदना, रक्तस्त्राव आणि खाज येण्यास सुरूवात होते .मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे शौचाच्या वेळी नैसर्गिकरित्या दाब निर्माण होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो .लोक शौचालयात जास्त वेळ थांबतात, शौचाची पहिली हाक दुर्लक्षित करतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.शौच घट्ट होते आणि शौचाची लय बिघडते. आतड्यांचा नैसर्गिक ताल बिघडू शकतो .मोबाईलमध्ये गुंतून राहिल्यामुळे नैसर्गिक संकेतांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढते.येथे क्लिक करा