जेवणापूर्वी सलाड खाल्ल्यास पचन सुधारते, भूक नियंत्रणात राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.जेवणापूर्वी फायबरने समृद्ध पदार्थ खाल्ल्यास एकूण कॅलरीचे सेवन कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.सलाड खाल्ल्याने शरीरातील स्टार्च आणि साखरेचे पचन हळू होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही .जेवणाच्या सुरुवातीला सलाड खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेता येतात .सलाडमधील कच्च्या भाज्यांमध्ये नैसर्गिक एंजाइम आणि फायबर असतात, जे पचनासाठी खूप महत्त्वाचे असतात.फायबरयुक्त सलाड नियमित सेवन केल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि पचनक्रिया सुरळीत चालते.सलाडमधील काकडी, लेट्युस आणि सेलेरी यांसारख्या अनेक घटकांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते .जेवणापूर्वी सलाड नियमितपणे खाल्ल्यास त्वचा निरोगी राहते आणि थकवा कमी होतो.सलाडमुळे शरीरातील विषारी पदार्थ नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता .येथे क्लिक करा