Curd Health Risks: दही सर्वांसाठीच गुणकारी नसतं! या ७ लोकांनी ते खाणं टाळावं...

Anirudha Sankpal

दह्यात गुड बॅक्टेरिया असतात. दही प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. पचनासाठी उत्तम...

मात्र तरी देखील दही प्रत्येकालाच सूट होते असं नाही. काही लोकांनी आपल्या आहारात दही घेणं टाळलेलच बरं.

दही कोणी खाऊ नये याबाबत डॉक्टर मानसी कृष्णा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक माहिती दिली आहे.

दही हे अभिष्यंदी आहे. त्यामुळं ते चॅनल ब्लॉक करतं. रात्री दही खाल्यावर सहसा सर्दी होतेच.

दही ज्यांना ह्रदयविकाराचा, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दही टाळावे.

त्याचबरोबर ज्यांचे युरिक अॅसिड वाढलं आहे त्यांनीही दही खाळं टाळावं.

ज्यांना त्वचा विकार आणि सोरायसिसचा त्रास आहे त्यांनी देखील दाही वर्ज्य करावं.

ज्यांना आमवाताचा त्रास आहे त्यांना दही खाणं लाभदायक नाही.

तसंच ज्यांना सतत सर्दी होण्याची त्रास आहे त्यांनी दह्यापासून लांब राहणंच योग्य.

येथे क्लिक करा