Electricity Saving Tips|वीज बिलाचा 'शॉक' बसतोय? या 'स्मार्ट' टिप्स जाणून घ्‍या

पुढारी वृत्तसेवा

हातात आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. वाढत्या महागाईत विजेचा खर्च कमी करणे हे आता मोठे आव्हान ठरत आहे.

जुन्या पिवळ्या बल्बच्या तुलनेत LED बल्ब ८० टक्क्यांपर्यंत वीज वाचवतात. कमी ऊर्जा आणि जास्त प्रकाश देणारा LED हाच बचतीचा उत्तम पर्याय आहे.

खोलीतून बाहेर पडताना दिवे आणि पंखे बंद करण्याची सवय लावा. विनाकारण चालू राहणारी उपकरणे तुमच्या खिशाला कात्री लावतात.

नवीन उपकरणे खरेदी करताना ५-स्टार (5-Star) रेटिंगलाच पसंती द्या. हे फ्रिज आणि एसी आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी वीज वापरून उत्तम कार्यक्षमता देतात.

एसी १८ अंशांऐवजी २४ ते २५°C वर सेट केल्यास थंडावा तर मिळतोच, पण वीज बिलातही लक्षणीय घट होते.

घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही स्वतःची वीज स्वतः तयार करू शकता. हा पर्यायी ऊर्जा स्रोत भविष्यासाठी सर्वात फायदेशीर गुंतवणूक आहे.

दिवसा घराच्या खिडक्या उघड्या ठेवून नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा. यामुळे दुपारच्या वेळी बल्ब लावण्याची गरज उरत नाही.

उपकरणे रिमोटने बंद केल्यानंतरही स्विचबोर्डमधून वीज खर्च होत असते. टीव्ही किंवा चार्जरचा 'स्टँडबाय मोड' टाळा आणि थेट मुख्य बटण बंद करा.

येथे क्‍लिक करा.