mental stress effects |तणावाचा होतो थेट चेहऱ्यावर परिणाम! त्वचा-केस का होतात कमकुवत?

पुढारी वृत्तसेवा

तणावाचा केवळ मनावरच नव्हे, तर तुमच्या त्वचा आणि केसांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.

मानसिक दडपणामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन मोठ्या प्रमाणात केसगळती सुरू होऊ शकते.

तीव्र मानसिक ताण शरीरातील मेलॅनिनवर परिणाम करतो, ज्यामुळे तरुण वयातच केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते.

तणावामुळे शरीरात 'कोर्टिसोल' हार्मोनचे प्रमाण वाढते, परिणामी चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात मुरुमे (Acne) येऊ लागतात.

सततच्या काळजीमुळे रक्ताभिसरण मंदावते आणि त्वचा आपला नैसर्गिक तजेला गमावून थकलेली दिसते.अधिक संवेदनशील बनते.

एक्झिमा आणि सोरायसिस सारखे त्वचेचे जुनाट आजार मानसिक तणावामुळे अधिक बळावू शकतात.

सततचा विचार आणि ताण झोपेच्या चक्रावर परिणाम करतो, ज्याचा थेट परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होतो.

दीर्घकालीन मानसिक ताण त्वचेवर सुरकुत्या निर्माण करतो, ज्यामुळे वयाआधीच वृद्धत्व जाणवू लागते.

येथे क्‍लिक करा.