पुढारी वृत्तसेवा
बनाना स्लग (Banana Slugs)
तेजस्वी पिवळ्या रंगाचे बनाना स्लग जंगलात मिनिटाला केवळ काही इंच. रांगत पुढे सरकतात, मृत वनस्पतींचे अवशेष विघटित करून ते पोषकद्रव्ये पुन्हा मातीमध्ये मिसळतात
सीहॉर्स (Seahorses)
सीहॉर्स ताशी सुमारे ०.०१ मैल इतक्या गतीने तरंगत फिरतात आणि वाहून जाऊ नये म्हणून शेपटीने समुद्री गवताला धरून राहतात
समुद्री अॅनिमोनी (Sea Anemones)
समुद्री अॅनिमोनी हे पृथ्वीवरील सर्वात संथ हालचाल करणारे जीव असून ते ताशी एक सेंटीमीटरपेक्षाही कमी हलतात. जागेवरच थांबून भक्ष्य स्वतःकडे येण्याची वाट पाहतात
कोआला (Koalas)
कोआलांनी दिवसातील सुमारे १६ तास झोपतात आणि ताशी अंदाजे ०.२ मैल इतक्या सौम्य वेगाने हालचाल करतात. संथपणा त्यांचा नैसर्गिक स्वभावच आहे
स्लो लोरिस (Slow Loris)
स्लो लोरिस फांद्यांवर अत्यंत सावधपणे सरकतो, त्यामुळे भक्षकांना त्याचा शोध घेणे कठीण जाते. हे निशाचर प्राणी मुद्दाम आणि शांतपणे हालचाल करतात
गिला मॉन्स्टर (Gila Monster)
गिला मॉन्स्टर अत्यंत संथपणे हालचाल करतो आणि उष्ण, कोरड्या अधिवासात ऊर्जा कमी वापरतो. त्याची संथ गती त्याच्या जीवनशैलीला अगदी अनुरूप आहे
गोगलगाय (Snails)
गोगलगाय चिकट श्लेष्माच्या पट्ट्यावरून घसरत पुढे सरकतात आणि त्यांचा वेग ताशी सुमारे ०.०३ मैल इतका असतो
विशाल कासव (Giant Tortoises)
जड कवच आणि संथ पावले असलेली विशाल कासवे कुठल्याही घाईत नसतात. गॅलापागोस कासव ताशी सुमारे ०.२ मैल वेगाने चालते
स्टारफिश (Starfish)
स्टारफिश लहान लहान नलिकासदृश पायांच्या साहाय्याने ताशी सुमारे ०.०९ मैल इतक्या वेगाने समुद्रतळावर सरकतात