अविनाश सुतार
हार्वर्ड येथे प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सोशल मीडियावर कांदा आणि लसणाबाबत स्पष्टीकरण दिले आहे
कांदा आणि लसणाला आहारशास्त्रात “पोषणमूल्यांचे भांडार” असे संबोधले जाते
लसूण आणि कांदा हे दोन्ही प्रीबायोटिक्स म्हणून कार्य करतात, आतड्यांतील उपयुक्त जीवाणूंना पोषण देतात
आतड्यांतील जीवाणूंची विविधता वाढल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन चयापचय सुधारतो आणि दाह (सूज) कमी होण्यास मदत होते
कांदा आणि लसूण हे केवळ सुरक्षितच नाहीत, तर दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त ठरलेले आहेत
कांदा आणि लसूण नियमितपणे आहारात समाविष्ट केल्यास शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होऊन कर्करोगाला प्रतिबंध होण्यास मदत होते
लसूण ठेचून किमान १० मिनिटे तसाच ठेवला, तर त्यातील गुणधर्म अधिक प्रभावी राहतात अॅलिसिन हेच लसणातील अनेक कर्करोगविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांसाठी जबाबदार आहे
कांदा, लसूण ऑलियम वर्गातील असल्याने रोगप्रतिकारक यंत्रणेचे संकेत नियंत्रित करणाऱ्या सूक्ष्मजीवांना आधार देतात. त्यामुळे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होऊ शकतो
ऑलियम यकृतातील डिटॉक्स एन्झाइम्स सक्रिय करतात आणि ट्युमरची वाढ मंदावतात. हे चांगल्या जीवाणूंना पोषण देतात आणि रोगप्रतिकारक संदेशवहन सुधारतात