Mental Health Tips : मनशांती हवीय? जाणून घ्‍या 'स्लो डाऊन'चा सिक्रेट फॉर्म्युला; मन होईल प्रसन्न!

पुढारी वृत्तसेवा

'स्लो डाउन' म्हणजे काम सोडणे नव्हे, तर आयुष्याचा अतिवेग कमी करून प्रत्येक क्षण जाणीवपूर्वक जगणे.

सततच्या पळापळीतून बाहेर पडून स्वतःला आणि मनाला विश्रांती देणे म्हणजेच स्लो डाउन.

हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, दैनंदिन आयुष्याचा वेग मंदावल्याने मेंदूला पुरेशी विश्रांती मिळते. शरीरातील कॉर्टिसॉल या 'स्ट्रेस हार्मोन्स'ची पातळी वेगाने खाली येते.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधनानुसार, दररोज काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मानसिक ताण, चिंता, नैराश्याचे प्रमाण तब्बल ३० टक्क्यांनी कमी होते.

सततच्या कामाच्या चक्रातून ब्रेक घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते. स्लो डाउनमुळे मानसिक थकवा दूर होऊन विचारांना नवी स्पष्टता मिळते.

घाईघाईत एकाच वेळी अनेक कामे करण्याऐवजी एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित केल्यास कामातील चुका टळतात आणि कामाचा दर्जा लक्षणीयरीत्या सुधारतो.

आयुष्याचा वेग मंदावल्याने केवळ मनालाच नाही तर शरीरालाही आराम मिळतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास आणि हृदयाचे ठोके सामान्य राहण्यास मदत होते.

जेवण्यापासून ते चालण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट घाईत न करता हळू आणि शांतपणे करा. अन्नाचा प्रत्येक घास आस्वादाने खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि मन तृप्त होते.

स्लो डाउनमुळे जवळच्या माणसांचे ऐकून घेण्याची क्षमता वाढते आणि नातेसंबंध घट्ट होतात.

दिवसातून किमान १५ ते २० मिनिटे मोबाईल/टीव्हीपासून दूर राहा. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा किंवा शांत बसून स्वतःशी संवाद साधा.

येथे क्‍लिक करा.