Sloughi Dog |वेगाचा बादशाह 'अरेबियन ग्रेहाऊंड' : ताशी स्पीड 70 किमी तेही 5 किमीपर्यंत!

पुढारी वृत्तसेवा

अरेबियन ग्रे हाऊंड हा जगातील सर्वात वेगवान कुत्र्यांची प्रजाती आहे. याचा टॉप स्पीड 60 ते 70 किलामिटर प्रतितास इतका असतो

याचे मूळ नाव ‘स्लोउघी' (Sloughi) असे आहे. हा मूळचा शिकारी कुत्रा आहे आणि डौलदारपणाबरोबरच आपले स्पीड जास्त अंतरापर्यंत कायम ठेवण्यासाठी हा ओळखला जातो

शिकारीचा पाठलाग करतान याने जर स्पीड पकडले तर न दमता सरासरी हा 5 किमी पर्यंत सावजाचा पाठलाग करु शकतो. इतका स्टॅमिना याच्यामध्ये असतो.

हा प्रामुख्याने उत्तर आफ्रिकेतील (मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया आणि लिबिया) या देशात आढळतो. वाळवंटातील कठीण परिस्थितीतही हरणाचा पाठलाग करण्याची क्षमता असते.

याच्या धावण्याच्या क्षमतेमागे खरी ताकत आहे याच्या शरीर रचनेत. यांचे शरीर अत्यंत स्लिम व लवचिक असते. त्यांची छाती खोल असते, ज्यामुळे फुफ्फुसांना जास्त ऑक्सिजन मिळतो आणि ते वेगाने धावू शकतात

यांची त्वचा खूप पातळ असते आणि केस अत्यंत आखूड असतात. यामुळे त्यांना कडक उष्णतेचा त्रास होत नाही.डोळे: यांचे डोळे मोठे आणि गडद असतात, त्यांची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते.

स्लोउघी ही एक अत्यंत प्राचीन जात आहे. उत्तर आफ्रिकेतील लेण्यांमध्ये हजारो वर्षांपूर्वीची यांची चित्रे आढळतात. त्‍यामुळे प्राचीन काळापासून लोकांचा शिकरीचा हा साथी आहे

हे कुत्रे आपल्या मालकाशी प्रचंड एकनिष्ठ असतात. ते कुटुंबातील सदस्यांवर खूप प्रेम करतात अनोळखी व्यक्तींशी ते लगेच मिसळत नाहीत.

शारिरीक वैशिष्ट्यांचा विचार केला तर यांचे सरासरी आयुर्मान१२ ते १५ वर्षे असते तर वजन१८ ते २८ किलोपर्यंत जाते. याची उंची६१ ते ७२ सेंटीमीटर

तो आपला ७० किमी तास हा सर्वोच्च वेग सलग १.५ ते २ किलोमीटर पर्यंत टिकवून ठेवू शकतो. त्यानंतर त्याचा वेग थोडा मंदावतो, पण तो थांबत नाही; तो ताशी ३०-४० किमी या वेगाने तासनतास धावू शकतो.

हे कुत्रे 'साईटहाउंड' (Sighthound) प्रकारात मोडतात. म्हणजेच, हे वासाऐवजी आपल्या तीक्ष्ण नजरेने शिकार शोधतात आणि तिचा पाठलाग करतात.

या कुत्र्यांचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यांना स्वतःला स्वच्छ ठेवायला आवडते. मांजरींप्रमाणे ते स्वतःला स्वच्छ करत असल्याचे अनेकदा दिसते.

थायलंडधील खेकडे पकडून खाणारी माकडे, पोहतातही एखाद्या स्विमरसारखी