Namdev Gharal
एरवी माकड, वानर म्हटले की आपल्या झाडावरुन इकडून तिकडे मोठी उडी मारणार, सरसर उंच शेंडा गाठणारा प्राणी, किडे, पाने फळे हा याचा प्रामुख्याने आहार
पण थायलंडमध्ये एक माकडाची अशी प्रजाती आहे जी समुद्रकाठाला जगण्याचे कसब शिकली आहे. समुद्रातून जे उपलब्ध होते ते हे खातात या माकडांना म्हणतात क्रॅब इंटींग मंकी
थायलंडच्या किनारपट्टीवर आणि बेटांवर ही माकडे मोठ्या प्रमाणात आढळतात, जिथे त्यांना अनेकदा 'सी मंकी' किंवा 'सी-साइड मंकी' म्हणून ओळखले जाते.
ओहोटीच्या वेळी (Low tide) जेव्हा समुद्राचे पाणी मागे सरकते, तेव्हा ही माकडे उघड्या पडलेल्या खडकांवर आणि चिखलात अन्न शोधण्यासाठी उतरतात.
यावेळी ते आजूपाबूच्या डोगंरावरुन खाली उतरतात व काठावर आलेले खेकडे, शेल पकडून व मजेने खातात शंख फोडण्यासाठी दगडांचा वापर करतात.
हे माकड उत्कृष्ट पोहणारे असून ते अन्नाच्या शोधात पाण्याखाली ३० सेकंद ते 1मिनिटापर्यंत श्वास रोखून धरू शकतात आणि मासे किंवा खेकडे पकडण्यासाठी डुबकी मारतात.
या माकडांनी हत्यारांचा वापर करण्याचेही कौशल्य अंगिकारले आहे. कडक कवचाचे शिंपले, ऑयस्टर किंवा शंख फोडण्यासाठी ते योग्य आकाराचे दगड निवडतात.
ते एका दगडाचा वापर 'हातोडी' म्हणून करतात आणि शंख फोडण्यासाठी दुसऱ्या मोठ्या दगडाचा वापर 'ऐरण' म्हणून करतात.
थायलंडमधील को पी पी (Koh Phi Phi), खाओ साम रोई योट (Khao Sam Roi Yot) आणि फँग नगा (Phang Nga) यांसारख्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये ही माकडे मोठ्या संख्येने आढळतात.
ज्यावेळी ओहोटीची वेळ होते त्यावेळी काठावर एक भोंगा वाजतो त्यावेळी या माकडांना कळते की भोजनाची वेळ झाली आहे.
यावेळी ते आजुबाजूच्या डोगंरावरुन खाली उतरतात व काठावर आलेले खेकडे, शेल पकडून व पाण्यात उतरुन मासेही पकडून मजेने खातात.
हत्यारांचा वापर, नवीन habitat अधिवासात भोजनाची व्यवस्था करणाऱ्या माकडांच्या या प्रजातीमधील या उत्क्रातीबाबत अनेक संशोधकही यांचा अभ्यास करत असतात.