Sleeping Without Pillow: उशी न घेता झोपणे चांगले.. इंटरनेटवरील दावा किती खरा किती खोटा?

Anirudha Sankpal

उशीशिवाय झोपल्याने आरोग्यात सुधारणा होते असा दावा इंटरनेटवर केला जात असतो. चला तर मग जाणकारांकडून हा दावा योग्य की अयोग्य हे जाणून घेऊयात

ऑर्थोपेडिक सर्जनच्या मते, झोपताना मान, डोके आणि संपूर्ण पाठीचा कणा एका रेषेत असणे सर्वात महत्त्वाचे असते.

कुशीवर झोपणाऱ्या व्यक्तीने उशी काढून टाकल्यास डोके गादीवर टेकते आणि खांदा व डोक्यामधील अंतरामुळे मानेवर ताण वाढू शकतो.

पाठीवर झोपताना उशी खूप उंच असेल तर मान आणि डोके पुढे झुकतात, त्यामुळे मानेच्या नैसर्गिक वक्राला आधार देणारी योग्य उंचीची उशी गरजेची असते.

पोटावर झोपताना मान एका बाजूला ठेवावी लागते, अशा स्थितीत जाड उशी वापरणे फायदेशीर ठरते.

उशी चांगली की वाईट हा प्रश्न नसून, तुमच्यासाठी योग्य उंची आणि डिझाईनची उशी कोणती आहे हे पाहणे आवश्यक आहे.

सकाळी उठताना मानेमध्ये कडकपणा, वेदना, डोकेदुखी किंवा खांद्यात अस्वस्थता जाणवल्यास तुमची झोपण्याची पद्धत आणि उशी बदलण्याची वेळ आली आहे.

मानदुखी कायम राहिल्यास सोशल मीडियावरील सल्ला पाळण्याऐवजी जाणकार डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

येथे क्लिक करा