Health Alert : जास्त उशा घेऊन झोपताय? सावधान! 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका..

पुढारी वृत्तसेवा

झोपताना २ किंवा ३ उशांची गरज भासणे अथवा श्वास गुदमरून अचानक जाग येणे, हे साधे लक्षण वाटू शकते. परंतु, ही एक गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.

डॉ. प्रियं बर्दोलोई यांनी X (ट्विटर) पोस्टद्वारे माहिती शेअर करत, या सूक्ष्म लक्षणांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

डॉक्टरांच्या मते, जर हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करत नसेल, तर सरळ झोपल्याने फुफ्फुसांमध्ये द्रव (Fluid) साचू लागते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि जास्त उशा घ्याव्या लागतात.

दिवसाच्या शेवटी पायाचे घोटे सुजणे, शूज घट्ट होणे किंवा त्वचेवर दाब दिल्यास खड्डा पडणे हे शरीरात द्रव साचल्याचे लक्षण असू शकते.

पायांवर अचानक आलेली सूज आणि त्यासोबत श्वास फुलणे किंवा अचानक वजन वाढणे, हे हृदय योग्य प्रकारे कार्य करत नसल्याचा मोठा संकेत आहे.

सहज होणारी कामे किंवा जिने चढताना आता प्रचंड थकवा येत असेल आणि श्वास फुलत असेल, तर याला फक्त वाढते वय मानून सोडून देऊ नका.

रात्री झोपल्यानंतर पायातील साचलेले द्रव पुन्हा रक्तप्रवाहात जाते, ज्यामुळे मूत्रपिंड जास्त लघवी तयार करतात. घोट्यांच्या सुजेसोबत हा त्रास अचानक सुरू झाल्यास हृदयाची तपासणी करा.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशननुसार, छातीत किंवा पोटात सतत जळजळ आणि वेदना होणे हा देखील हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोक्याचा इशारा असू शकतो.

हात, पाठीतील वेदना किंवा पायांमध्ये सतत होणारा त्रास (पेरीफेरल आर्टरी डिसीज) ही हृदयाच्या आरोग्याशी संबंधित लक्षणे आहेत, त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

येथे क्‍लिक करा.