Weight Loss : झोपेतही वजन कमी होऊ शकतं! रात्री प्या 'ही' ७ पेयं, पोटाची चरबी होईल कमी

मोहन कारंडे

वजन कमी करण्यासाठी आपण दिवसा अनेक प्रयत्न करतो. यामध्ये व्यायाम करण्यापासून ते डाएटिंगपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. 

पण, तुम्हाला माहित आहे का की रात्री शांत झोपेत असतानाही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता?

काही नैसर्गिक पेयं अशी आहेत, जी रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास तुमच्या शरीराला आराम तर मिळतोच, पण त्याचबरोबर तुमचा मेटाबॉलिझम वाढवून झोपेतही चरबी कमी होण्यास मदत होते.

अशाच ८ पेयांबद्दल जाणून घेऊया, जी तुमच्या वेट लॉस प्रवासाला चालना देऊन रात्रीच्या वेळी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

कॅमोमाइल चहा : कॅमोमाइल चहा तुमच्या शरीराला आराम देण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी उत्तम मानला जातो. हा चहा शरीरातील तणावाची पातळी कमी करतो, ज्यामुळे शांत झोप लागते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला मदत मिळते.

कोमट लिंबू पाणी : झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो आणि रात्रभर चरबी जाळण्यास चालना मिळते.

दालचिनीचा चहा : दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे रात्री-अपरात्री लागणारी भूक कमी होते. तसेच, झोपेच्या दरम्यान चयापचय क्रिया सुधारण्यासाठीही दालचिनी उपयुक्त ठरते.

मेथीचे पाणी : मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर व चरबीची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

काकडीचा रस : काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ती हायड्रेशन व फायबरचा उत्तम स्रोत आहे. काकडीचा रस शरीरातील सूज कमी करतो आणि झोपेच्या दरम्यान हळूहळू चरबी कमी करण्यास मदत करू शकतो.

आल्याचा चहा : आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी (दाहक-विरोधी) आणि चरबी कमी करणारे गुणधर्म असतात. आल्याचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराची नैसर्गिकरित्या चरबी जाळण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम होते.

हळदीचे दूध : कोमट दुधात हळद घालून प्यायल्याने त्यात असलेल्या 'ट्रिप्टोफॅन' नावाच्या घटकामुळे चांगली झोप लागते. यासोबतच हळदीतील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म चरबी कमी करण्यासही मदत करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Bachata Dance | canva photo
प्रेम, आकर्षण वाढवण्यासाठी हा डान्स एकदा कराच!