प्रेम, आकर्षण वाढवण्यासाठी हा डान्स एकदा कराच!

पुढारी वृत्तसेवा

बचाटा हा एक रोमँटिक आणि भावनिक पार्टनर डान्स आहे.

बचाटा डान्सची सुरुवात डोमिनिकन रिपब्लिकमधून झाली. एकेकाळी दुर्लक्षित असलेला हा नृत्यप्रकार आज जगभरात प्रसिद्ध आहे.

हा डान्स विशेषतः बचाटा संगीतावर आधारित असतो, ज्यामध्ये प्रेम, विरह आणि भावना व्यक्त करणारे शब्द आणि गिटारच्या तालावर चालणारी गोड धून असते.

बचाटा हा खूप जवळून केला जाणारा डान्स आहे. यात पार्टनरमध्ये चांगला समन्वय आणि भावना असतात.

बचाटामध्ये ४ स्टेपचा रिदम असतो, तीन पायऱ्या आणि एक हिप मूव्हमेंट (१-२-३-टॅप) यावर आधारित हा डान्स खूपच सेन्सुअल असतो.

डोमिनिकन बचाटा, मॉडर्न बचाटा, आणि सेन्सुअल बचाटा असे तीन प्रकार आहेत. सेन्सुअल प्रकारात हळुवार हिप मूव्हमेंट्स, बॉडी रोल्स आणि जास्त एक्सप्रेशन असतात.

बचाटा या पार्टनर डान्समुळे जोडीदारासोबत शारीरिक आणि मानसिक समन्वय वाढते. संबंध अधिक घट्ट आणि रोमँटिक होतात.

डान्स करताना तुम्ही स्वतःमध्ये हरवून जाता, ज्यामुळे मानसिक तणाव दूर होतो.

सेंस्युअल बचाटामधील स्टेप्समुळे जवळीक वाढते, यामुळे काहींच्या मते हा डान्स आता मर्यादा ओलांडतोय.

Jacqueline Fernandez | Instagram Jacqueline Fernandez
जॅकलीनने शेअर केला ‘दम दम’ गाण्यातील आवडता सीन