sleep and health : गाढ झोप औषधांइतकीच महत्त्वाची! अपुऱ्या झोपेमुळे मिळते 'या' गंभीर आजारांना निमंत्रण
पुढारी वृत्तसेवा
अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे एका नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे. जाणून घेऊया त्या आजारांविषयी...
अपुऱ्या झोपेमुळे भूक वाढवणाऱ्या हार्मोन्समध्ये बदल होतो. व्यक्ती अतिरिक्त आहार घेतो, त्यामुळे वजन वाढू लागते.
झोपेच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
पुरेशी झोप न मिळाल्यास शरीरात तणावाचे हार्मोन्स वाढतात आणि जळजळ होते, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.
अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाब वाढलेलाच राहतो. यामुळे पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
कमी झोपेमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीर संक्रमणास अधिक बळी पडते.
दीर्घकाळ झोपेची कमतरता असल्यास स्मरणशक्तीवर परिणाम होतो. डिमेन्शिया सारख्या आजारांचा धोका वाढतो.
झोपेच्या अनियमिततेमुळे मेंदूतील रसायनांवर परिणाम होतो. नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.
निरोगी आयुष्य जगण्यासाठी पुरेशी झोप घेणे हे औषधांइतकेच महत्त्वाचे आहे.
येथे क्लिक करा.