Lemon Water : दररोज लिंबूपाणी पिताय? पण, याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?
पुढारी वृत्तसेवा
लिंबूपाणी हे एक आरोग्यदायी आणि शरीराला ताजेतवाने ठेवणारे पेय आहे.
लिंबूपाण्यातील 'क' जीवनसत्त्व आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते आरोग्यदायी आहे.
लिंबूपाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
लिंबूपाणी खूप गरम करू नये, कारण जास्त उष्णतेमुळे 'क' जीवनसत्त्व नष्ट होऊ शकते.
लिंबूपाणी खूप गरम करू नये, कारण जास्त उष्णतेमुळे 'क' जीवनसत्त्व नष्ट होऊ शकते.
ॲसिडिटीचा त्रास असणार्यांनी लिंबू पाण्यामुळे पोटदुखी किंवा जळजळ होऊ शकते.
लिंबूपाण्याचे नियमित सेवन दातांच्या इनॅमेलला नुकसान पोहोचवू शकते. ॲसिडमुळे दात कमकुवत होऊ शकतात.
स्ट्रॉने लिंबूपाणी पिणे किंवा प्यायल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरणे या उपायांनी दातांच्या इनॅमेलचा धोका कमी करता येतो.
लिंबूपाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास आणि पचनास मदत करू शकते; पण त्याला कोणतेही 'जादुई डिटॉक्स पेय' समजण्याची चूक करू नका.
येथे क्लिक करा.