Sleep Health Tips |गाढ झोपेसाठी दररोज किती वेळ व्‍यायाम गरजेचा?

पुढारी वृत्तसेवा

तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल, तर त्यामागे तुमच्या शारीरिक हालचालींचा अभाव हे मुख्य कारण असू शकते.

'फ्रंटियर्स ऑफ सायकियाट्री'मध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या संशोधनानुसार, शारीरिक आरोग्य आणि झोप यांचा थेट संबंध आहे.

धावपळीची जीवनशैली, डिजिटल उपकरणांचा अतिवापर आणि वाढते प्रदूषण यामुळे भारतीयांच्या झोपेचे गणित बिघडले आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि तज्ज्ञांनी वयोगटानुसार व्यायामाचे काही निकष ठरवून दिले आहेत.

मुले आणि किशोरवयीन मुले (५-१८ वर्षे) यांनी दररोज किमान दररोज किमान ६० मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाचा व्यायाम करणे गरजेचे आहे.

प्रौढ व्यक्ती (१८-६४ वर्षीय वयोगटातील ज्यांचे काम बसून आहे, त्यांनी दररोज ३० ते ४५ मिनिटे वेगाने चालणे आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी व्यायाम कराणे आवश्‍यक आहे.

मध्यम हालचाल असणार्‍यांनी आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम आणि २ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आवश्‍यक आहे.

६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍यांनी समतोल राखणारे व्यायाम जेणेकरून पडल्यामुळे होणाऱ्या दुखापती टाळता येतील.

तज्‍ंज्ञांच्‍या मते. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, तणाव वाढवणारे हार्मोन्स कमी होतात आणि झोपेसाठी पोषक ठरणारे 'मेलाटोनिन' हार्मोन उत्सर्जित होते.

येथे क्‍लिक करा.