Sleep and Brain Health : शांत झोप आणि मेंदूच्‍या आरोग्‍याचा थेट संबंध? नवा रिसर्च

पुढारी वृत्तसेवा

मधुमेह आणि हृदयविकारासारख्या आजारांचा मेंदूवर होणारा वाईट परिणाम शांत झोपेमुळे टाळता येऊ शकतो, असे नव्‍या संशोधनात आढळले आहे.

Canva

स्वीडनच्या 'कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट'च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, उत्तम झोप घेणाऱ्या रुग्णांची विचार करण्याची क्षमता अधिक चांगली असते.

टाइप २ मधुमेह, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे.

या आजारांचा थेट संबंध स्मरणशक्ती कमी होणे आणि स्मृतीभ्रंश आजारांच्या वाढत्या धोक्याशी जोडलेला आहे.

'यूके बायोबँक'मधील ४ लाखांहून अधिक मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांच्या माहितीचे विश्लेषण करून हा अभ्यास तयार करण्यात आला आहे.

झोपेचा कालावधी, जैविक घड्याळ (Circadian Rhythm), निद्रानाश, घोरणे आणि दिवसा येणारी झोप या ५ घटकांचे मूल्यमापन करण्यात आले.

चांगली झोप घेणाऱ्या रुग्णांचे आरोग्‍य वाईट झोपणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त आढळले.

बहुतेक लोकांसाठी झोपेच्या सवयी सुधारणे सहज साध्य करता येण्यासारखे ध्येय आहे.

झोपची गुणवत्ता वाढली की मेंदूचे आरोग्‍य सुधारते हेच नवा अभ्‍यास सांगतो.

Brain Health Tips | pinterest
येथे क्‍लिक करा.