Anirudha Sankpal
गोरेपणाच्या अयोग्य क्रीम्समुळे त्वचा पातळ, संवेदनशील, लालसर होणे आणि पिंपल्स येणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
काही क्रीम्स वापरणे थांबवल्यास त्वचेवरील काळे डाग (पिग्मेंटेशन) आधीपेक्षा अधिक तीव्रतेने परत येतात.
स्टिरॉइड्स (Corticosteroids) युक्त क्रीम्सचा दीर्घकाळ वापर केल्यास चेहऱ्यावर अतिरिक्त केस येणे आणि त्वचा कायमची खराब होण्याचा धोका असतो.
हायड्रोक्विनोन (Hydroquinone) चा अयोग्य किंवा विना-डॉक्टरी सल्ला वापर त्वचेवर काळे-निळे डाग पाडू शकतो.
काही फेअरनेस क्रीम्समध्ये पाऱ्याचा (Mercury) वापर केला जातो, ज्यामुळे केवळ त्वचाच नाही तर शरीरातील इतर अवयवांवर दुष्परिणाम होतो.
क्रीममधील पारा त्वचेवाटे रक्तात मिसळून किडनी (मूत्रपिंड) आणि मज्जासंस्थेला कायमचे नुकसान पोहोचवू शकतो.
थकवा, अंगावर सुज येणे किंवा उच्च रक्तदाब ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे असून, गरोदर महिला व बालकांसाठी हे अत्यंत घातक ठरते.
इंटरनेटवरील जाहिराती किंवा 'हर्बल' नावावर न भुलता, डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याशिवाय कोणतीही फेअरनेस क्रीम वापरणे टाळावे.