Sitting posture : पाठ-मानदुखीपासून सुटका हवी? बसण्याची पद्धत बदला

पुढारी वृत्तसेवा

दीर्घकाळ बैठे काम करणार्‍यांनी खुर्चीवर योग्‍यरित्‍या बसणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

AI Generator Image | AI Generator Image

खुर्चीवर बसताना पाठ पूर्णपणे सरळ ठेवा, कुबड नका काढू.

पाय हवेत न ठेवता जमिनीवर पूर्ण टेकलेले असावेत. योग्यरित्या बसल्याने अभ्यासाच्या लांब सत्रांदरम्यान तुमच्या पाठ, मान आणि खांद्यांवरील ताण कमी होतो.

गुडघे कंबरेइतके किंवा थोडे खाली असणे योग्य. चांगली स्थिती बसल्‍याने मेंदूला रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुधारते, ज्यामुळे तुम्ही सतर्क राहता.

योग्य शारीरिक स्थितीमध्‍ये बसल्‍याने स्नायूंवरील ताण कमी होतात. स्क्रीन डोळ्यांच्या सरळ रेषेत ठेवल्यास मानदुखी टळते.

पाठीस आधार असलेली खुर्ची मणक्यासाठी फायदेशीर ठरते. पाठीच्या कण्याला आधार मिळतो आणि भविष्यातील पाठीच्या समस्या टाळता येतात.

ताठ बसल्याने तुमचे फुफ्फुस पूर्णपणे विस्तारतात. श्वासोच्छ्वास सुधारतो आणि तुम्हाला ऊर्जावान वाटते.

खुर्चीवर सलग बसू नका. दर ३०–४० मिनिटांनी थोडा ब्रेक घेणे आवश्यक.

खुर्चीवर तुमचं सलग बसणे होत असेल तर मान आणि खांद्यांचे हलके स्ट्रेचिंग करा.

येथे क्‍लिक करा.