Sinkhole Danger: टर्कीचे भयानक खड्डे; भारतीय शेतकरी संकटात?

Vishal Bajirao Ubale

जमीन अचानक फाटायला लागली आहे

टर्की देशाच्या शेतीमध्ये सध्या एक भीतीदायक संकट आलं आहे. तिथे जमिनीला अचानक ७०० हून अधिक प्रचंड मोठे खड्डे (Sinkholes) पडले आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की त्यात अख्खे ट्रॅक्टर आणि शेतं काही सेकंदात गायब होत आहेत.

Sinkhole Danger | Internet

हे नक्की का घडतंय?

टर्कीच्या जमिनीखाली चुनखडीसारखे (Limestone) मऊ खडक आहेत. हजारो वर्षांपासून पाण्यामुळे जमिनीखाली छोट्या गुहा तयार झाल्या होत्या. जोपर्यंत या गुहांमध्ये पाणी होतं, तोपर्यंत वरच्या जमिनीला आधार मिळत होता.

Sinkhole Danger | Internet

अतोनात पाणी उपसल्याचा परिणाम

शेतीसाठी जमिनीखालून खूप जास्त पाणी उपसल्यामुळे हे संकट ओढवलं आहे. ऊस आणि मक्यासारख्या पिकांना खूप पाणी लागतं. जेव्हा जमिनीखालचं हे पाणी संपलं, तेव्हा त्या खालच्या गुहा पोकळ झाल्या आणि जमिनीचा आधारच निघून गेला.

Sinkhole Danger | Internet

हवामान बदल आणि दुष्काळ

पाऊस कमी झाल्यामुळे जमिनीखालची पाण्याची पातळी पुन्हा भरली गेली नाही. निसर्गाचं चक्र बिघडल्यामुळे जमिनीला आधार देणारं पाणीच शिल्लक राहिलं नाही. परिणामी, जमिनीचा वरचा थर अचानक कोसळू लागला आहे.

Sinkhole Danger | Pexels

भारतालाही याचा मोठा धोका आहे

भारत हा जगातील सर्वात जास्त भूजल (Groundwater) वापरणारा देश आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये जमिनीखालच्या पाण्याची पातळी दरवर्षी १ मीटरने खाली जात आहे. हे असंच चालू राहिलं तर आपल्या पायाखालची जमीनही पोकळ होऊ शकते.

Sinkhole Danger | Pexels

आपली जमीनही खचू शकते

भारताची जमीन थोडी वेगळी असली तरी इथे 'लँड सबसिडन्स' (Land Subsidence) म्हणजेच जमीन खचण्याचा धोका आहे. जमिनीला मोठे तडे जाणे किंवा रस्ते खचणे असे प्रकार आता आपल्याकडेही दिसू लागले आहेत.

Sinkhole Danger | Pexels

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्रात चंद्रपूर आणि यवतमाळ भागात चुनखडीचे पट्टे आहेत, तिथे जमीन खचण्याचा धोका जास्त आहे. नुकताच पुण्यात एक मोठा ट्रक रस्ता खचल्यामुळे जमिनीत गाडला गेला होता. हे सर्व जमिनीखालच्या हालचालींचेच संकेत आहेत.

Sinkhole Danger | Pudhari

हे नुकसान भरून निघणारं नाही

एकदा का जमीन खचली किंवा तिला भगदाड पडलं, तर ती पुन्हा पूर्ववत करता येत नाही. यामुळे शेतीचं कायमचं नुकसान होतं आणि तिथल्या घरांनाही धोका निर्माण होतो. भविष्यात आपली सुपीक जमीन राहण्यायोग्य राहणार नाही, अशी ही भीती आहे.

Sinkhole Danger | Pexels

आपण काय करू शकतो?

आपल्याला आताच सावध व्हावं लागेल. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी बाजरी, ज्वारी सारखी कमी पाण्याची पिके घेतली पाहिजेत. बोअरवेलवर नियंत्रण आणि पावसाचं पाणी जमिनीत जिरवणा हाच यावरचा एकमेव उपाय आहे.

Sinkhole Danger | Pexels

Wildlife Friendly Highway: जीव वाचवणारा..भारतातला पहिलाच आगळावेगळा हायवे

Wildlife Friendly Highway | Pudhari
येथे क्लिक करा